मुसळवाडी तलावाच्या जलपूजनाची परंपरा यंदा खंडित

मुसळवाडी तलावाच्या जलपूजनाची परंपरा यंदा खंडित

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील सुमारे पंचवीस गावांना जलसंजीवनी देणार्‍या मुसळवाडी तलाव निसर्गाच्या कृपेने शंभर टक्के भरून तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही शासकीय किंवा राजकीय जलपूजनाची दर वर्षाची परंपरा खंडित झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या तलावाची साठवण क्षमता सुमारे 189 दशलक्ष घनफूट असून या तलवातून मुसळवाडीसह, टाकळीमिया, लाख, जातप, त्रिंबकपूर, दरडगाव, महाडुकसेंटर, मालुंजे खुर्द, माहेगाव, खुडसरगाव, पाथरे खुर्द, शेनवडगाव, तिळापूर, बोरीफाटा, कोपरे, वांजुळपोई आदी गावांना शेती व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. जल पूजनाची दर वर्षाची मोठी परंपरा असताना संबंधित शासकीय विभाग व राजकीय मंडळींना विसर पडल्याने परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून लवकरात लवकर जलपूजन करण्याची मागणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com