मुसळवाडी जलाशय 100 टक्के भरला

मुसळवाडी जलाशय 100 टक्के भरला

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) मुसळवाडी तलाव (Musalwadi Lake) पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, देवळाली प्रवरा पाटबंधारे विभागाचे (Deolali Pravara Irrigation Department) उपअभियंत आर.एन.थोरे, मुसळवाडी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी एस.बी.सुरबकर, शाखाधिकारी जावेद सय्यद यांनी दिली.

मुसळवाडी तलाव (Musalwadi Lake) पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे (Former MP Prasad Tanpure) व ना. प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुळा (Mula) व भंडारदरा धरणाच्या (Bhandardara Dam) पाण्यातून मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरून घेण्यात आला आहे. जलाशयावर सुमारे 20 ते 25 गावातील पिण्याची पाणी योजना व शेतीसिंचन योजना अवलंबून असून सुमारे दोन हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुसळवाडी तलाव (Musalwadi Lake) मुळा धरणातील (Mula Dam) डाव्या कालव्याद्वारे व भंडारदरा धरणातील उजव्या कालव्याद्वारे दरवर्षी भरला जातो.

जलाशयातून मुसळवाडी (Musalwadi) सह टाकळीमिया ,लाख ,जातप, दरडगाव, त्रिंबकपूर, मालुन्जा खुर्द ,महालगाव ,खुडसरगाव, माहेगाव ,पाथरे खुर्द ,शेणवडगाव, कोपरे ,तिळापूर ,बोरीफाटा, वांजुळपोई आदी. गावाना पिण्याचे पाणी योजनेद्वारे व श्री म्हसोबा महाराज पाणीवापर संस्थेमार्फत शेती सिंचनासाठी पाणी दिले जाते. मुसळवाडी तलाव भरण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी वृंद यांनी सुयोग्य नियोजन केले असून वर्षभर पाणी पुरणार असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com