मुरूम व दगडाची चोरी; सहा शेतकर्‍यांविरूध्द गुन्हा

मुरूम व दगडाची चोरी; सहा शेतकर्‍यांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वत:च्या शेतातील मुरूम व दगड नेण्यासाठी परवानगी न घेेेतल्याने सहा शेतकर्‍यांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कामगार तलाठी सचिन सिताराम शिंदे (वय 37 रा. निमगाव वाघा ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

बाबु आनंदा गुंजाळ (रा. घोसपुरी), संजय आप्पासाहेब धामणे, पोपट भाऊ धामणे, ज्ञानदेव भाऊ धामणे, विशाल सुखदेव धामणे, प्रमोद सुखदेव धामणे (सर्व रा. सारोळा कासार ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत.

वरील शेतकर्‍यांनी 1 मे, 2019 ते 14 ऑगस्ट, 2022 दरम्यान त्यांच्या घोसपुरी व सारोळा कासार शिवारातील शेत जमिनीतून 67 हजार 846 रूपये किंमतीचे मुरूम व दगड हे विना परवाना बेकायदा कोणाची काही एक परवानगी नसताना चोरून नेला आहे, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com