पकडलेला मुरूमाचा डंपर पळविला

नगरमधील घटना, तलाठी पथकाला धक्काबुक्की
पकडलेला मुरूमाचा डंपर पळविला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवैधरित्या मुरूमाची वाहतूक करणारा डंपर (Dumper Transporting Murum Illegally) तलाठी पथकाच्या ताब्यातून पळविण्यात आला. नगर-दौंड रोडवरील (Nagar-Daund Road) कायनेटीक चौकात (Kinetic Chowk) ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) डंपर चालक अजिनाथ साळवे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व तीन अनोळखी इसमांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सावेडीचे (Savedi) कामगार तलाठी सागर एकनाथ भापकर (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. अवैधरित्या मुरूमाची वाहतूक (Illegal Transport of Murum) केली जात असल्याची माहिती तलाठी भापकर यांना मिळाली होती. ते पथकासह कारवाईसाठी गेले. त्यावेळी त्यांनी साडेतीन ब्रास मुरूम (Murum) असलेला डंपर ताब्यात घेतला. त्याचा पंचनामा केला.

तो डंपर नगर तहसील कार्यालयाकडे घेऊन जात असताना कारमधून तीन अनोळखी इसम आले. त्यांनी कायनेटीक चौकात डंपरला कार आडवी लावून तलाठी पथकाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तलाठी भापकर यांच्या ताब्याती कारवाईचे कागदपत्रे हिसकावून घेतले व डंपर पळवून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहे.

Related Stories

No stories found.