मुर्शतपुर शिवारात नागवेली लागवडीचा प्रयोग

मुर्शतपुर शिवारात नागवेली लागवडीचा प्रयोग

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शेतीत नाविन्यपूर्ण लागवडीचे प्रयोग केले तर शेतकत्याला त्यातून शिकायला मिळते आणि त्याची आर्थिक उन्नती व्हायला हातभार लागतो. तालुक्यातील मुर्शतपुर येथील विक्रांत रासकर या प्रयोगशील शेतकर्‍याने नागवेली (पान) लागवडीचा तालुक्यात सर्वप्रथम प्रयोग केला असुन तेलबिया संशोधन केंद्र जळगावचे प्रमुख शास्त्रज्ञ संजीव पाटील, कृषितज्ञ पोपटराव खंडागळे यांचे मार्गदर्शन या शेतकर्‍याला मिळाले आहे.

कोपरगांव तालुका राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रात राज्यात नावाजलेला आहे. येथील शेतकरी ध्यासपूर्ण व नाविन्य अत्याधुनिकता मानुन शेती करणारे आहेत. पोहेगांव येथील कृतीशिल शेतकरी स्वःशामराव औताडे या शेतकर्‍यांने एकरी 117 मे टन उसाचे उत्पादन घेतले होते. मुर्शतपुर येथील रामदास शिंदे या शेतकर्‍याने फुले विक्रम जातीच्या हरभरा पीक उत्पादनात तालुक्यात सर्वप्रथम हेक्टरी 25 क्विंटल सर्वाधिक उत्पादन घेतले. तर संवत्सर येथील प्रगतशिल शेतकरी राजेंद्र भाऊसाहेब शिंदे या शेतकर्‍यांने एकरी 20 क्विंटल सोयाबीनचे सर्वाधीक उत्पादन घेऊन तालुक्यात नावलोकिक मिळविलेला असून कृषी तज्ञ पोपटराव खंडागळे कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयोग करत असतात.

असाच नावलौकीक प्राप्त करून ध्यास घेत मुर्शतपूर येथील शेतकरी विक्रांत रासकर हे तयार झाले व त्यांनी आपल्या शेतात नागवेली (पान) लागवडीवर भर दिला आहे. राज्यात एरव्ही नागवेलीचे सर्वाधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे होते. प्रत्येक हिंदू सणांत नागवेलीला विड्याचे पानाला खुप महत्व आहे. नागवेली विड्याचे पानात आयुर्वेदिक घटक मोठ्या प्रमाणात असतात. अग्नेय आशियात तांबुल पानविडा मुखशुद्धीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पुणेरी पान, कलकत्ता पान, बनारसी पान, मद्रासी पान, मसाला पान असे कितीतरी पानाचे प्रकार आहेत. पारंपारीक पीक पद्धतीत बदल करून नविन्यतेचा ध्यास घेऊन नागवेलीची लागवड कोपरगांव तालुक्यात मुर्शतपुर येथे केली जात आहे हे विशेष. श्वास दुर्गंधी दूर करून जखम बरी करण्याची ताकद नागवेलीत आहे.

28 मार्च हा जागतीक पान दिवस आहे. कृषीतज्ञ पोपटराव खंरागळे आणि त्यांच्या पत्नी कृषी सहाय्यक संगिता सोळसे हे दोघेही शेतकर्‍यांची आर्थिक क्रयशक्ती वाढावी म्हणून शेत शिवार फेरीअंतर्गत शेती शाळा घेऊन शेतकर्‍यांना सातत्याने त्यांच्या बांधावर जात प्रोत्साहन देत असतात. विक्रांत रासकर या शेतकर्‍यांने नागवेली पान लागवड तंत्र समजुन घेत माती पाणी व इतर रोग किड याचा अभ्यास करून ऊस, सोयाबीन, मका, गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदि पीक लागवडी पेक्षा हटके काही तरी करून दाखवु या उद्देशाने विक्रांत रासकर यांनी हे धाडसाचे पाऊल उचललेेआणि यात नक्की यशस्वी होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला.

तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कृषी अधिकारी अविनाश चंदन, कृषी सहाय्यक संगीता सोळसे, राजेंद्र तुंभारे आदी त्यासाठी प्रेरणा देत असुन कृषीतज्ञ पोपटराव खंडागळे यांनी नागवेली पान लागवड व त्याचा तौलनिक अभ्यास या शेतकर्‍याला देत आहे. यात पानवेलीतील पानावरील ठिपके, रोपे मर, कोळी, सुत्रकृमी यांचे व्यवस्थापन, विविध रासायनीक बुरशीनाशके यांची माहिती देत लागवडीपासुन नियोजन केल्यास एकात्मीक पद्धतीने रोग कीड टाळून उत्पादन सहज घेता येते असे खंडागळे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com