दसपुते यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

लासूर स्टेशन परिसरात पकडले || एमआयडीसी पोलिसांची कारवाई
दसपुते यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पत्रकाराला फोन करून पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी पत्रकार सचिन दसपुते (वय 28, मूळ रा. गोपाळपूर, ता. नेवासा, हल्ली रा. भगवानबाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समजताच त्यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही तांत्रिक तपास केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार शाबीर शेख, जयसिंग शिंदे, रवी सोनटक्के, प्रशांत राठोड यांनी संशयित शिवम संतोष पांडे (वय 25 रा. लासूर स्टेशन, औरंगाबाद) याला ताब्यात घेतले आहे.

सोमवारी दुपारी 4 वाजता दसपुते हे दैनिकाच्या कार्यालयात असताना त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. अनोळखी व्यक्तीने ‘तुम पत्रकार बोल रहे हो क्या, आपने स्वामी प्रसाद मोर्य के बारे मे टेलिकास्ट चलाया, मैं इलाहाबाद से बात कर रहा हूँ, आप स्वामी प्रसाद मोर्य के बारे मे लिखना बंद कर दो, नहीं तो, हम आपको उठाके ठिकाणे लगा देंगे, आप कहासे जाते हो, कहासे आते हो हमको सब पता है, मै आपको लाईव्ह मर्डर दिखाता हूँ, और इसका इलजाम आपके उपर डाल देंगे’, असे म्हणत धमकी दिली.

‘अभी देखो तुम्हारा ही गेम बजाएंगे, नही तो क्या करना है बोलो, अभी आपका ही मर्डर हो जायेगा, मैं प्रयागराज से बोल रहा हूँ, कुछ करना पडेगा, मुझे पाच लाख रुपये देणे पडेंगे, नहीं तो आपकाही मर्डर हो जायेगा, अभी इसके बाद दोबारा फोन नहीं करेंगे, जल्द से जल्द आप मुझे पाच लाख रुपये दे दो, अभी आप समज जाओ तुम्हारे नाम पे इधर एक मर्डर केस दाखल हो गया है, ये सब झंझटसे आपको छुटकारा पाना है, तो मुझे जल्द से जल्द पाच लाख रुपये दो’, अशी धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागितली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com