पाथर्डीत तरूणाचा खून

पाथर्डीत तरूणाचा खून

गुन्हा दाखल : ३ आरोपींना अटक

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) -

तालुक्यातील खेर्डे येथील तरुणाचा खून झाला असून राजेंद्र रामकीसन जेधे (वय ३०) असे मयत तरूणाचे नाव आहे. जुन्या वादातून तिक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे जेधे याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रशांत बबन शेळके, किशोर भाऊसाहेब शेळके, प्रवीण बबन शेळके, बबन जगन्नाथ शेळके यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिनही आरोपींना अटक केली आहे.

शेषराव दत्तू जेधे जेधे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पुतण्या राजेंद्र जेधे व गावातील प्रशांत शेळके यांच्यात दोन वर्षांपूर्वी गावातील एका लग्नामध्ये नाचण्याच्या कारणावरून वाद आणि त्यातून हाणामारी झाली होती. त्यावेळी तक्रार न करता आपसात वाद मिटला होता. तेव्हापासून मनात खुन्नस धरून नेहमी शिल्लक गोष्टीवरून एकमेकासोबत वाद, भांडण करत होते. शुक्रवारी (दि. ३) रात्री ९ वाजेच्या सुमारास आरोपी किशोर भाऊसाहेब शेळके, प्रवीण बबन शेळके, बबन जगन्नाथ शेळके हे घराजवळ येऊन यांनी मोठ्याने आवाज देऊन जेधे याला घराबाहेर बोलावून रस्त्यावर ओढले व शिवीगाळ केली.

यातील आरोपी प्रशांत शेळके याने त्याच्या हातात असलेल्या चाकूने मयत जेधे याच्या पोटावर मारल्याने गंभीर दुखापत होऊन जेधे याचा मृत्यू झाला. त्यांनतर रात्री उशीरा त्याला पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात जेधेला मृत घोषित करण्यात आले. मयत तरूण हा एका पेट्रोल पंपावर कामास होता. आरोपी प्रशांत बबन शेळके (वय २३), प्रवीण बबन शेळके (वय २६), बबन जगन्नाथ शेळके (वय ४७), (सर्व राहणार खेर्डे ता.पाथर्डी) या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ बुधवंत, भगवान सानप, अतुल शेळके, राहुल खेडकर आदी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण हे पुढील तपास करत आहे. या घटनेने गावात एकच खळबळी उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com