आईला मारहाण करणार्‍या बापाचा मुलाकडून खून

पारनेर तालुक्यातील वासुंदे गावातील घटना
आईला मारहाण करणार्‍या बापाचा मुलाकडून खून

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पाण्याच्या बाटलीमध्ये (Water Bottle) भरलेली दारू (Alcohol) दिली नाही, म्हणून आईला (Mother) शिविगाळ करून मारहाण (Beating) करणार्‍या बापाला (Father) मुलाने (Son) लाकडी दांडक्याने केलेल्या बेदम मारहाणीत (Beating) बापाचा मृत्यू (Father Death) झाला. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सरपणावर पडून वडीलांचा मृत्यू (Death) झाल्याचा बनाव मुलगा राहूल झावरे याने केला होता. मात्र, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप (Police Inspector Ghanshyam Balap) यांना संशय आल्याने त्यांनी एक तास कसून चौकशी (Investigation) केली असता मारहाणीत वडीलांचा मृत्यू (Beating Father Death) झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आईच्या फिर्यादीवरून मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करणत आला. पारनेर पोलिसांनी (Parner Police) राहुल यास अटक (Arrested) केली आहे.

यासंदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब झावरे (वय 50) हे नेहमी दारू पिवून पत्नी मंदा यांना मारहाण करीत. शुक्रवारी रात्री दारू पिऊन येत त्यांनी मंदा यांना शिविगाळ करून बेदम मारहाण (Beating) केली. त्यानंतर पत्नीला घरात कोंडून घेत दाराला कुलूप लाऊन घेतले होते. काही वेळानंतर त्यांचा मुलगा राहुल हा देखील दारू पिऊन मित्रासोबत घरी आला. घराला लावलेले कुलूप पाहून मुलगा व वडीलांमध्ये वाद (Dispute) झाला. त्यानंतर वडीलांनी कूलूप उघडून सर्वांनी घरात प्रवेश केला. घरात गेल्यानंतर वडीलांनी पाण्याच्या बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या दारूची (Alcohol) पत्नी मंदा यांच्याकडे मागणी (Demand) केली. ती देण्यास मंदा यांनी नकार दिला. त्यावेळीही त्यांनी शिविगाळ करून पत्नीला मारहाण (Beating) केली.

वडीलांच्या जाचामुळे मुलगा राहूल याच्या मनामध्ये प्रचंड असंतोष होता. आईने स्वयंपाक करून सर्वजणांनी जेवण केले. त्यानंतर वडील घरामागील शेताकडे निघून गेले. आईला मारहाण होत असल्याने संतापलेल्या राहूलने पाठीमागून जात वडील बाळासाहेब झावरे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली. तसेच चेहर्‍यावरही गंभीर इजा झाली होती. डोक्यास जबर मार लागल्यामुळे झावरे हे जमीनीवर कोसळले. वडील गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहूल याने रूग्णवाहीका बोलवून त्यांना टाकळीढोकेश्वर (Taklidhokeshwar) येथील ग्रामीण रूग्णालात (Rural Hospital) उपचारासाठी हालविले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी घोषीत केले.

आपणाकडून वडीलांचा खून (Father Murder) झाल्याची जाणीव झाल्यानंतर राहूल याने चलाखी करीत टाकळी दुरक्षेत्रात जाऊन बनाव करण्याचा प्रयत्न केला. तसा जबाबही त्याने पोलिसांना लिहून दिला. 22 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास माझे व वडीलांचे दारू पिऊन आल्यामुळे वाद झाले. त्यानंतर घरामागील रस्त्याने वडील शेताकडे निघून गेले. रात्री 11.30 च्या सुमारास आईसह वडीलांचा शोध घेण्यासाठी ते गेलेल्या रस्त्याच्या दिशेने गेलो असता काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या सरपणात वडील पालथे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. आरडाओरडा केल्यानंतर मित्र सागर भाउसाहेब देशमुख हा तेथे अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन आला. त्यांनतर त्यांना टाकळीढोकेश्वर ग्रामीण रूग्णालात (Taklidhokeshwar Rural Hospital) दाखल करण्यात आल्याचा राहूलने जबाब लिहून दिला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com