<p>अहमदनगर|Ahmedagar</p><p>स्वयंपाक करीत नाही म्हणून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला लोखंडी गजाने मारहाण करून त्याचा खून केला. </p>.<p>बाबादीन झंडु निसाद (वय ३९ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. खून करणारा कामगार महेश सिवराम निसाद (वय २९ रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. केडगाव बायपास रोडवरील लक्ष्मी स्क्रॅप या भंगार दुकानात ही घटना घडली. भंगार दुकानाचे मालक अशोक रामस्वरूप निसाद यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक निसाद यांच्या भंगार दुकानात बाबादीन व महेश हे दोघे कामगार आहे. बाबादीन हा स्वयंपाक करीत नसल्याने महेश याने त्याला मारहाण करून त्याचा खून केला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे.</p>