खुनातील दोघा पसार आरोपींना वाहतूक पोलिसांनी पकडले

खुनातील दोघा पसार आरोपींना वाहतूक पोलिसांनी पकडले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पत्नीशी असलेल्या संबंधाच्या संशयावरून सिन्नर येथील तरुणाचा खून करणार्‍या राहात्याच्या दोघा पसार आरोपींना वाहतूक पोलिसांनी सापळा रचून पकडले.

ही घटना 11 जानेवारी रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास राहाता न्यायालयामागील मोकळ्या जागेत घडली होती. पत्नीच्या नात्यातील एकाशी तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून प्रविण बनकर व त्याचा भाऊ सचिन बनकर यांनी सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील राहुल जेजूरकर व शाम जेजूरकर यांना राहाता येथे बोलावून घेत त्यांना रात्रीच्यावेळी न्यायालयाच्या मागील बाजूस नेऊन बेदाम मारहाण केली होती.

दोघांवर शिर्डी सुपर स्पेशालीटी रुग्णालयात उपचार सुरू असताना राहुल जेजूरकर याचा मृत्यू झाला होता. शाम जेजूरकर याच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी वरील दोन्ही आरोपीसह इतर दोन अशा चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे दोघे आरोपी पसार झाले होते.

याबाबत आरोपी राहाता परिसरात आले असून ते चारचाकी वाहनातून जात असल्याची माहिती पो. नि. सुभाष भोये यांना खबर्‍यांकडून मिळाली त्यानुसार वाहतूक नेमणुकीवर असलेल्या पो. ना. चंद्रकांत भोंगळे, सुधाकर काळोखे व कल्याण काळे यांनी सापळा रचून चितळी रोडवर आरोपी जात असताना त्यांना ताब्यात घेतले. खुनाच्या गुन्ह्यात राहाता पोलिसांनी दोघांनाही अटक केली. मुख्य दोन्ही आरोपी सापडल्याने पसार असलेल्या दोघांची नावेही लवकरच बाहेर येतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com