
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
लालटाकी येथील महिलेच्या खूनाच्या गुन्ह्यातील चार वर्षापासून पसार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. बाळू अशोक घोरपडे (वय 36, रा. सिध्दार्थ नगर) असे त्याचे नाव आहे. बेबी शिरसाठ यांच्या खूनाची घटना 10 एप्रिल 2019 रोजी घडली होती.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी माहिती मिळाली, घोरपडे हा त्याच्या राहत्या घरी आला आहे. आहेर यांच्या सूचनेवरून हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, सागर ससाणे, रोहित येमूल, आकाश काळे, रणजीत जाधव यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव बाळू घोरपडे असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
फिर्यादी माया शिरसाठ (वय 35, रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी) यांची बहिण भारती आव्हाड (रा. पाथर्डी) व फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे सारिका भारस्कर यांच्या नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडणे झाली होती. त्या कारणावरुन 10 एप्रिल 2019 रोजी दुपारच्या वेळी भारस्कर व त्यांचे नातेवाईक नितीन दिनकर व इतर आरोपींनी फिर्यादी व तिची सासू बेबी शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके, चाकू, तलवारी या हत्यारांनी मारहाण करुन जखमी करुन फिर्यादी यांची सासू बेबी शिरसाठ यांची हत्या केली होती.