मुलीच्या खुनात दहा वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

मुलीच्या खुनात दहा वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जामखेड मधील लहान मुलीचा खून करून दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. दादा महादेव मुटके असे अटक केल्या आरोपीचे नाव आहे.

रामदास सुखदेव फाळके यांच्याशी किरकोळ वाद झाले होते. आरोपी दादा महादेव मुटके हा साथीदारांसह 11 जुलै 2012 मारहाण करण्यासाठी आला. त्यादिवशी रामदास फाळके बाहेर गेले होते. त्यांच्या पत्नीस मारहाण सुरू केली. त्यावेळी त्यांची नात संगितामध्ये पडली. आरोपीने धारदार शस्राने तिच्या गळ्यावर वार करून खून केला. तेव्हापासून दादा मुटके हा फरार होता. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी आरोपीचा शोध घेऊन पकडण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली, आरोपी मुटके हा स्वतःची ओळख लपवून जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील बाबू केकाण यांच्याकडे घराचे बांधकाम करण्यासाठी आलेला आहे.त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतत्वाखाली पथकास पाठविले होते. त्यांनी आरोपीस त्याठिकाणी जाऊन शिताफीने अटक केली. त्यास जामखेड पोलिस ठाण्यात हजर केले. पुढील कारवाई जामखेड पोलिस ठाणे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com