चाकू, रॉडने चौघांवर खुनी हल्ला करत लुटले

वाटेफळ शिवारातील घटना || पिकअपची तोडफोड
चाकू, रॉडने चौघांवर खुनी हल्ला करत लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पिकअपमधून जाणार्‍यांवर चाकू, दगड व रॉडने खुनी हल्ला करून त्यांच्याकडील 13 हजार 650 रुपयांची रोख रक्कम लुटली. नगर तालुक्यातील वाटेफळ शिवारात पुलाजवळ बुधवारी (दि. 2) दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली.

हल्ल्यात सुशांत रमेश जंजिरे (वय 23 रा. हातवळण देवीचे ता. नगर), संतोष पुंडलिक खिलारे (रा. येळेगाव, ता. कळंबोली, जि. हिंगोली), रमेश जंजिरे व मुकुंद जंजिरे (दोघे रा. हातवळण देवीचे) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान सुशांत जंजिरे यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भवानी पवार, सागर वाळके, शुभम मोकळे व शुभम ऊर्फ बाबू चौधरी (पूर्ण नावे माहिती नाही) यांच्याविरूध्द गुरूवारी (दि. 3) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी सुशांत, त्यांचे वडिल रमेश, चुलत भाऊ मुकुंद व कामगार खिलारे पिकअपमधून वाटेफळ शिवारातून जात असताना पुलाजवळ चौघांनी पिकअपला दुचाकी आडवी लावली.

सुशांतसह चौघांवर चाकूने वार करून दगड, रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पिकअपची तोडफोड करून नुकसान केले व पिकअपमधील पैसे असलेली बँग घेऊन पसार झाले. जखमींवर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com