दिराकडून भावजयीचा खून

मद्यपी भावाला मारल्याचे कारण || दोघांना अटक
दिराकडून भावजयीचा खून

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

घरात किराणा सामान आणण्यासाठी पैसे न देता दारू पित बसलेल्या नवर्यास चापट मारल्याचा राग आल्याने मद्यपी दिराने भावजयीच्या डोक्यात लाकडी ढलपी घालुन खुन केल्याची घटना जामखेड तालुक्यातील साकत येथे घडली. या प्रकरणी पतीसह दिराला पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे.

अतुल अरूण घोडेस्वार व बाळु अरूण घोडेस्वार (रा. साकत, जा. जामखेड)अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर या घटनेत सीमा बाळु घोडेस्वार (35, रा. साकत) हिचा मृत्यू झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळु यास दारूचे व्यसन आहे. रविवार (दि. 8) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मयत सीमा ही गावातील एका शाळेत दारु पित बसलेल्या पतीकडे घरातील कीराणा सामानासाठी पैसे मागण्यासाठी गेली होती. मात्र पैसै देण्यास पतीने नकार देताच संतप्त पत्नी सीमा हीने पतीला तेथेच एक हाताने चापटड मारली. तसेच दारु पीऊ नये म्हणुन खिशातील 400 रु काढुन घेतले. यावेळी तीचा दिर अतुल हा त्या ठिकाणी होता.

सीमा हिने बाळुला चापट मारल्याचा अतुल यास राग आल्याने तो सीमाच्या मागोमाग घरी आला. व घरातील जळणाच्या लाकडातील ढलपी काढून त्याने सीमा हिच्या डोक्यात घाव घातले. यात सीमा गंभीर जखमी झाल्याने तीला जामखेड येथील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तो पर्यंत तीचा मृत्यू झाला आसल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. याप्रकरणी मयत सीमा हीचे वडील राजेंद्र आश्रुबा सरोदे (रा. घुमरा. पारगाव. ता. पाटोदा. जिल्हा बीड) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती बाळु अरुण घोडेस्वार व दिर अतुल अरुण घोडेस्वार यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी काही तासातच तातडीने कारवाई करीत दोघा अरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com