मनपा आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी

नगरसेविका ज्योती गाडे यांची मागणी
मनपा आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .यासाठी नागरिक मनपा आरोग्य केंद्रावर करोना प्रतिबंधक लसीकरनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. अनेक वेळा गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणण्यावर भर द्यावा, अशी मागणी नगरसेविका ज्योती गाडे यांनी निवेदनाद्वारे केली.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे या लसीकरण केंद्रावर कुठल्याही प्रकारे नियोजन नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.त्यामुळे नागरिकांना दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. तासन-तास नागरिक या लसीकरण केंद्रावर उभे राहतात परंतु लसीकरण आपले होणार का नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिकेने आरोग्य केंद्रावर डॉक्टरांचे नंबर दिले आहेत परंतु हे नंबर बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. नागरिकांचा या डॉक्टरांसोबत संपर्क होत नाही तरी लसीकरण केंद्रावर असलेल्या संबंधित डॉक्टर व अधिकारी यांनी दूरध्वनी चालू ठेवण्याचे आदेश द्यावे.

मनपा आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी
video : नगरकरांची रस्त्यावर गर्दी कायम : करोना साखळी कशी तुटणार?

मनपा आरोग्य केंद्रात नागरिक लसीकरणासाठी भल्या पहाटेपासूनच रांगा लावून गर्दी करत आहेत.लसी संदर्भात माहिती देण्यासाठी केंद्रावर मनपाचा आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नसतो त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवर रोष निर्माण झाला आहे तरी आयुक्त शंकर गोरे यांनी आरोग्य विभागास सूचना कराव्यात व लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी अशा मागणीचे निवेदन नगरसेविका ज्योती गाडे यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com