नगरपालिका निवडणुका लांबण्याच्या शक्यतेमुळे देवळाली प्रवरातील अनेक इच्छुकांचा हिरमोड

नगरपालिका निवडणुका लांबण्याच्या शक्यतेमुळे देवळाली प्रवरातील अनेक इच्छुकांचा हिरमोड

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

इतर मागासवर्गीय जागांचा घोळ मिटत नसल्याने व जो पर्यंत ओबीसी आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने नगरपरिषदांच्या निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव राज्यशासनाने चालू अधिवेशनात केला त्यास सर्व पक्षांनी मान्यता दिल्याने पाच ते सहा महिने नगरपरिषदांच्या निवडणुका लांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेची मुदत 24 डिसेंबर रोजी संपली. त्याच दिवशी अध्यक्ष,उपाध्यक्षां सह सर्व नगरसेवकांना नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या वतीने सन्ममानपुर्वक निरोप देण्यात आला. या नंतर केंव्हा ही निवडणूक लागण्याची शक्यता वाटत असल्याने सत्ताधारी व विरोधक दोघेही कामाला लागले होते. मात्र ओबीसी आरक्षणावरून शासनाने निवडणूक आयोगाला निवडणूक आरक्षण जाहीर होईपर्यंत निवडणुका न घेण्याचा ठराव केल्याने सर्वांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.

सध्या तरी नगरपरिषदेचा कारभार मुख्याधिकारी बघत असले तरी केव्हाही शासनाचा प्रशासक नियुक्त झाल्याचा आदेश येऊ शकतो. प्रशासक म्हणून शक्यतो प्रांताधिकारी यांनाच काम पहावे लागते.परंतु काही कारणास्तव ते जर उपलब्ध होऊ शकत नसतील तर मात्र तहसीलदार यांच्याकडे हा पदभार देण्यात येतो. ही झाली शासकीय बाजू पण निवडणुकीसाठी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. आता निवडणूक पुढे ढकलल्याचा फायदा नेमके कोणाला होणार, सत्ताधारी कि, विरोधक याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com