
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महानगरपालिकेच्यावतीने शहरातील पथदिवे बसवण्यासाठी खाजगी एजन्सीला ठेका दिला असून संपूर्ण शहरात पथदिवे बसविण्यात आले आहे. ठेकेदाराकडून अटी शर्ती प्रमाणे तातडीने कामे करून घ्यावी, विद्युत विभागातील अडचणी सोडविण्यासाठी विविध उपायोजना करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अधिकारी कर्मचारी व खासगी एजन्सीला दिल्या आहेत. यावेळी विद्युत विभाग प्रमुख वैभव जोशी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत आयुक्तांनी सांगितले की, शहरात बसवण्यात आलेल्या पथदिव्यांची माहिती व्हावी यासाठी जिओ टॅगिंगचा सर्वे तातडीने करा, पोलवरच्या नंबरिंगचे काम तातडीने मार्गी लावा जेणेकरून पोलची संख्या कळण्यास मदत होईल व पोल नंबरच्या आधारे गेलेल्या पथदिव्याची माहिती लवकर समजेल व दुरुस्तीसाठी विलंब होणार नाही्.
राहिलेले सुमारे 800 पथदिवे बसविण्याचे काम बाकी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावे व विद्युत विभागातील कर्मचार्यांवर विभागून जबाबदारी द्या जेणेकरून काम करण्यास सुलभता येईल, अशा सूचना यावेळी आयुक्त डॉ. जावळे यांनी दिल्या.