मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिकेला मनपा देणार जागा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिकेला मनपा देणार जागा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा समाजातील आर्थिक दुर्बल गरीब विद्यार्थ्यांंसाठी शहरात लवकरच वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नालेगाव येथील महापालिकेची रिकामी जागा सकल मराठा समाज अहमदनगर या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. सदर जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

सकल मराठा समाज संस्थेस नालेगाव येथील जागा हस्तांतरित करण्याबाबतचा ठराव 11 जून 2021 रोजी महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. तथापि या जागेच्या हस्तांतरण प्रक्रियेबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी आ. संग्राम जगताप व उपमहापौर भोसले यांच्याकडे सदर मुद्दा मांडला. उपमहापौर भोसले यांनी त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जागा हस्तांतरणातील त्रुटींवर सविस्तर चर्चा केली. नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार वैभव जोशी व जितेंद्र सासवडकर यांना पातळीवर येणार्‍या अडचणी दूर करून जागा तातडीने सकल मराठा समाजाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com