महानगरपालिकेस थ्री स्टार मानांकन

20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
महानगरपालिकेस थ्री स्टार मानांकन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagr

केंद्रीय शहरी कार्य मंत्रालय व स्वछ भारत अभियान अंतर्गत (Swachh Bharat Abhiyan) महानगरपालिकेस (Municipal Corporation) कचरा मुक्त शहर (Garbage Free City) या विभागात थ्री स्टार मानांकन (Three Star Rating) मिळाले आहे.

20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन येथे राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद (President Dr. Ramnath Kovind), शहरी विकास मंत्री डॉ. हरदीप पुरी, प्रधान सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते राज्यातील एकूण 91 महानगरपालिका व नगर पालिका यांचा गौरव होणार आहे. यात अहमदनगर मनपाचा ही घनकचरा व्यवस्थापन व कचरा मुक्तीमध्ये केलेल्या कामाचा विज्ञान भवन दिल्ली येथे गौरव होणार आहे.

महानगरपालिकेने स्वछ सर्वेक्षण 2021 (Clean Survey 2021) मध्ये यशाचे सातत्य राखत कचरा मुक्तीचे थ्री स्टार मानांकन (Three Star Rating) व हागणदारी मुक्त शहराचे मानांकन मिळवले आहे. अशी माहिती आयुक्त शंकर गोरे आणि उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com