सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

महाविकास आघाडीतर्फे कवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी विभागीय आयुक्तांकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत सभापती पदासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज नगरसचिव एस.बी.तडवी यांच्याकडे दाखल केला आहे. दरम्यान, समितीतील आघाडीचे संख्याबळ पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, माजी सभापती कुमार वाकळे, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरूडे, उपसभापती मीना चोपडा, नगरसेविका सुवर्णा गेनाप्पा, सुनीता कोतकर, माजी विरोध पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, शाम नळकांडे, अनिल बोरूडे, विनित पाउलबुधे, मुदस्सर शेख, अमोल गाडे, संतोष गेनाप्पा, संजय चोपडा आदी यावेळी उपस्थित होते.

नगर शहरात महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती देण्यासाठी शिवसेना व महाविकास आघाडी काम करत आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याने सर्वांचा मला पाठिंबा आहे. समितीमधील सर्वच सदस्यांचे सहकार्य असल्याने मी निवडून येईल, असा विश्वास कवडे यांनी व्यक्त केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com