मनपा शाळेची इमारत जमीनदोस्त

मनपा शाळेची इमारत जमीनदोस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तोफखाना परिसरातील धोकादायक बनलेली मनपा शाळेची इमारत मनपाने जमीनदोस्त केली. सदर इमारतीचा पाया खचलेला होता. पावसामुळे इमारत पडण्याची शक्यता होती. त्यामुळे ती उतरवून घेण्यात आल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुमारे 120 इमारतींना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच पावसामुळे अपघात घडून इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने अशा इमारती उतरवून घेण्यात येत आहेत. तोफखाना परिसरातील मनपा शाळा नंबर 23 दादासाहेब रूपवते विद्यालयाची इमारत धोकादायक बनली होती. इमारतीचा पाया खचल्याने भींतीला तडे गेले होते. त्यामुळे ती उतरवून घेतल्याचे इथापे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com