महानगरपालिकेच्या रक्तपेढीत प्लाझ्मा निर्मितीचे मशीन धूळखात पडून

महानगरपालिकेच्या रक्तपेढीत प्लाझ्मा निर्मितीचे मशीन धूळखात पडून

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मा दान सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. यासाठी करोना रुग्णांनी प्लाझ्मा दान करून करोना रुग्णांनाचे जीव वाचविण्यासाठी पुढे यावे, असे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात येते आहे.

मात्र, नगर महानगरपालिकेचा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे मनपा रक्तपेढीतील लाखो रुपयाचे प्लाझ्मा निर्मिती मशीन धूळखात पडून आहे. हे मशीन लवकरात-लवकर सुरू करण्यासाठी मनपा आरोग्य समितीच्या वतीने पुढाकार घेतला आहे. यामुळे लवकरच हे मशीन सुरू होणार आहे.

दरम्यान, आ.संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मनपाच्या रक्तपेढीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मशीन खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिला होता. परंतु महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनतेला करोनाच्या काळात आरोग्य सेवेपासून वंचित ठेवले जात आहे असा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे यांनी केला. मनपा आरोग्य समितीच्या वतीने कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीला भेट देऊन माहिती घेतांना समितीचे अध्यक्ष डॉ. बोरुडे, सदस्य निखिल वारे, सदस्य संजय ढोणे, सदस्य सतीश शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी वारे पुढे म्हणाले,शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असून मनपातील अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे गेल्या दोन वर्षापासून सिटीस्कॅन मशिन जागेअभावी धूळ खात पडून आहे. करोनाच्या संकट काळामध्ये शहरातील करोना रुग्णांना चाचणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. परंतु हेच महापालिकेच्या सिटीस्कॅन मशिन चालू असते तर हा खर्च वाचला असता.

दुसरीकडे मनपा आरोग्य अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे प्लाझ्मा निर्मितीचे मशीन पॅथॉलॉजिस्ट अभावी गेल्या दोन वर्षभरापासून धूळ खात पडून आहे.हे मशीन सुरु असते तर हजरो करोना रुग्णांचा जीव वाचला असता तसेच गोरगरीब रुग्णांना माफक दरात किंवा विनामूल्य आरोग्य सेवा देता आली असती, असे वारे म्हणाले

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com