महानगरपालिकेत सभा सुरु होण्यापूर्वी होणार राष्ट्रगीत

सभापती कुमार वाकळे यांची सूचना
महानगरपालिकेत सभा सुरु होण्यापूर्वी होणार राष्ट्रगीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) स्थायी समितीची (Standing Committee) यापुढील प्रत्येक सभा होण्यापूर्वी ‘जन गण मन...’ हे भारताचे राष्ट्रगीत (Indian National Anthem) म्हटले जावे अशी सूचना स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे (Speaker Kumar Wakale) यांनी अधिकार्‍यांना दिली. त्यानूसार आज महानगरपालिकेचा 2022 -2023 चा अर्थसंकल्पाच्या (Budget) सभेला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रगीत (National Anthem) म्हणण्यात आले.

स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक मुदस्सर शेख, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका गौरी ननवरे, तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com