मनपा सभागृह नेतेपदी ‘यांची’ झाली नियुक्ती

मनपा सभागृह नेतेपदी ‘यांची’ झाली नियुक्ती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) सभागृह नेतेपदी (Leader of the House) नगरसेवक अशोक बडे (Corporators Ashok Bade) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, दत्ता सप्रे, अमोल येवले, मदन आढाव, आकाश कातोरे, भालचंद्र भाकरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) म्हणाल्या, महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असून, यात नगरसेवकांची भुमिका महत्वाची ठरत आहे. विविध विषयांवर मनपा सभामध्ये (Municipal Corporation Meeting) होणार्‍या चर्चेतून अनेक प्रश्न सुटत आहेत. यात सभागृहनेता (Leader of the House) म्हणून आपली भुमिका ही महत्वाची ठरणार आहे.

निवडीनंतर सभागृहनेते अशोक बडे (Leader of the House Ashok Bade) म्हणाले, महापौर रोहिणी शेंडगे व सर्व नगरसेवकांच्या (Corporators) सहकार्याने आपली या पदावर नियुक्ती झाली आहे. या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबर महानगरपालिकेच्या कार्यात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करू.

याप्रसंगी विलास शिरसाठ, बबन केतकर, दिलीप पेटकर, बाळासाहेब पाखरे, अ‍ॅड.पोपट बडे, बाळू भोर, भैय्या साठे, अण्णासाहेब फुंदे, मगर आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com