
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मनपा प्रशासनातील बांधकाम, पाणीपुरवठा, इलेक्ट्रिक व नगररचना विभागात अभियंते व तत्सम तांत्रिक पदे रिक्त आहेत. मनपाच्या प्रशासकीय कामावर मोठ्या प्रमाणवर ताण पडतो आहे. त्यामुळे कंत्राटी अभियंते व इतर तांत्रिक कर्मचारी मानधन तत्वावरच भरण्यात यावे व प्रशासनातील कामांना गती देण्याचे काम करावे, आठ दिवसांत आमची मागणी मान्य करावी, अन्यथा आपल्या कार्यालयात आम्ही लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करू, असा इशारा आ. संग्राम जगताप यांच्यासह नगरसेवकांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले आहे.
यावेळी आ. जगताप, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती कुमार वाकळे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, निखिल वारे, प्रा. माणिकराव विधाते, अमोल गाडे, मोहन कदम आदी उपस्थित होते.