महापालिकेत उद्यापासून शुकशुकाट

कर्मचारी गेले लाँगमार्चला || प्रशासन अस्वस्थ
महापालिकेत उद्यापासून शुकशुकाट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अखेर तो दिवस उजाडला व कर्मचारी लाँग मार्चला निघाले. आज सोमवारी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असल्याने मनपाचे कामकाज आज तसेही बंद होते. मात्र, उद्या मंगळवारपासून (3 ऑक्टोबर) महापालिकेत चक्क शुकशुकाट पसरणार आहे. या पार्श्वभूमीवर, शहराच्या स्वच्छतेबाबत प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेची तयारी ठेवली असली तरी दैनंदिन कार्यालयीन कामकाज मात्र बंद पडणार असल्याने प्रशासन अस्वस्थ आहे.

महापालिकेत उद्यापासून शुकशुकाट
195 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आठवडाभरात ?

महिनाभरापासून मनपा कामगार संघटना लाँग मार्चचे नियोजन करीत होती. सातवा वेतन आयोग व वारसा हक्काने नोकरी या दोन मागण्यांसाठी मागील 5 सप्टेंबरला सत्याग्रह व काम बंद आंदोलनही केले व 2 ऑक्टोबरला नगर ते मुंबई लाँग मार्च काढण्याचा इशारा दिला होता. संघटनेच्या या इशार्‍याची त्यावेळी प्रशासनाने फारशी दखल घेतली नाही. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस लाँग मार्च नियोजनाची माहिती बाहेर येऊ लागल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले व हा लाँग मार्च होऊ नये म्हणून चर्चेच्या फेर्‍याही सुरू झाल्या. सुरुवातीला आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कामगार संघटनेशी चर्चा केली. पण कामगार संघटना ठाम होती.

महापालिकेत उद्यापासून शुकशुकाट
खुनाचा प्रयत्न; मालेगावला पळून जाण्याच्या तयारीत असलेले श्रीरामपूरचे पाचजण ताब्यात

त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही बैठक घेतली व सातव्या वेतन आयोगाबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तसेच वारसा हक्काने नोकरी मिळण्याबाबत दोन दिवसात सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोडे यांच्यासमवेत बैठक घेण्याचेही आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर बैठकीतूनच मंत्री बनसोडे यांना दूरध्वनीही करून कामगार संघटनेशी त्यांची चर्चाही घडवून आणली. पण, अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका कामगार संघटनेची होती. त्यामुळे त्यांनी सोमवारी लाँग मार्चचा रस्ता धरला. परिणामी, मनपात उद्यापासून शुकशुकाट होणार आहे व हा लाँग मार्च 16 दिवस चालला तर तेवढे दिवस मनपात फक्त अधिकार्‍यांची दालनेच सुरू असल्याचे दिसेल.

महापालिकेत उद्यापासून शुकशुकाट
‘क्विक सपोर्ट’ अ‍ॅप डाऊनलोड केले अन् पाच लाखांना चुना

लाँग मार्च किती चालणार ?

वारसा हक्काने नोकरीच्या विषयावर राज्यभरातील मनपा व नगरपालिका कामगारांचा पाठिंबा नगरच्या लाँग मार्चला आहे. राज्यात पहिल्यांदाच असा मोर्चा निघाला आहे. त्यामुळे तो थांबवण्यासाठीच्या हालचाली शासनाला कराव्या लागणार आहेत. चर्चा व बैठकांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणार असल्याने हा लाँग मार्च किती दिवस चालणार, याची उत्सुकता आहे.

नाही कुणाच्या बापाचा...

सातवा वेतन आयोग हक्काचा...नाही कोणाच्या बापाचा..., हम सब एक है.. अशा घोषणा गेत सोमवारी सकाळी कर्मचार्‍यांचा लाँग मार्च निघाला. सुमारे एक हजारावर कर्मचारी यात सहभागी झाले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com