मनपाच्या धिसाळ कारभारावर उपमहापौर नाराज

मनपाच्या धिसाळ कारभारावर उपमहापौर नाराज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत (Majhi Vasundhara Abhiyan) महानगरपालिकेला (Municipal Corporation) मिळालेल्या पुरस्कारानिमित्त गुरूवारी दुपारी चार वाजता मनपामध्ये कर्मचार्‍यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, कार्यक्रमाला अधिकारी वर्गच वेळेवर उपस्थित न राहिल्याने उपमहापौर गणेश भोसले (Deputy Mayor Ganesh Bhosale) यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत कार्यक्रम स्थळावरून निघून गेले.

मनपाच्या धिसाळ कारभारावर उपमहापौर नाराज
अश्लिल व्हिडीओ करून तरुणास ब्लॅकमेल करत 40 लाखांस लुटले

माझी वसुंधरा अभियाना (Majhi Vasundhara Abhiyan) अंतर्गत मनपाला महाराष्ट्र सरकारने नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित केले. त्या पार्श्वभूमीवर मनपाच्यावतीने गुरूवारी कर्मचार्‍यांचा गुणगौरव करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अधिकारी वर्गातील नियोजन शून्य व ढिसाळ कारभारामुळे कार्यक्रमाचा अक्षरशा फज्जा उडाला.

मनपाच्या धिसाळ कारभारावर उपमहापौर नाराज
अकोलेच्या एस.टी. चालकाने माळशेज घाटातील दरीत उडी घेत केली आत्महत्या

चार वाजता सुरू होणार्‍या कार्यक्रमाकडे आयुक्त, उपायुक्त व इतर अधिकार्‍यांनी पाठ फिरवली. पुरस्काराचा मनपा प्रशासनाला कुठलाही अभिमान वाटत नसल्यामुळे मी 4.45 वाजता या कार्यक्रमातून उठून गेलो आहे. नगर शहराच्या अभिमानात भर घालणारा पुरस्कार मिळाला असतानाही पालिका प्रशासनामध्ये कुठलाही उत्साह दिसत नाही. त्यामुळे मी प्रशासनाचा निषेध (Administration Protest) व्यक्त करतो अशी भावना उपमहापौर भोसले (Deputy Mayor Ganesh Bhosale) यांनी यावेळी व्यक्त केले.

मनपाच्या धिसाळ कारभारावर उपमहापौर नाराज
एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये अवैध धंद्यांचे बस्तान
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com