
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शुक्रवारी दुपारी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे व उपस्थित अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.
आयुक्त शंकर गोरे यांची नगरपरिषद प्रशासन संचालनालय येथे उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर यापूर्वी महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केलेले पंकज जावळे यांची नियुक्ती नगर विकास विभागाने केली आहे. अकोला महापालिकेत ते उपायुक्त म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी त्यांनी नगरमध्ये येऊन प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला.
यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, प्रसिध्दी अधिकारी शशिकांत नजान, आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, नगरसचिव शहाजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे, हाफिज सय्यद, संगणक विभागप्रमुख अंबादास साळी, स्वीय सहाय्यक लक्ष्मण ढवळे आदी उपस्थित होते.