
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरात सर्रास चायना मांजाचा वापर व विक्री सुरू असल्याकडे लक्ष वेधत जाणीव फाउंडेशनच्यावतीने बुधवारी आयुक्त पंकज जावळे व अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच शहरात महापालिकेच्या पथकांनी पतंग व मांजा विक्री करणार्या दुकानांवर छापेमारी सुरू केली. मात्र, एकाही ठिकाणी मनपाला चायना मांजा आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले.
दुसरीकडे शहरात चायना मांजाचा वापर सर्रासपणे सुरू असल्याने विक्री कुठून होते, याचा शोध घेण्याची गरज आहे. चायना मांजामुळे शहरात अनेक जण जखमी झाले आहेत. खुद्द महापालिकेचे प्रसिद्ध अधिकारी शशिकांत नजान यांनाही चायना मांजामुळे काही दिवसांपूर्वी दुखापत झाली. चायना मांजामुळे जखमी झालेल्या दोन ते तीन व्यक्तींसह जाणिव फाउंडेशनच्या सदस्यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन व्यथा मांडल्या.
त्यांनी पोलिस अधीक्षकांनाही निवेदन दिले. त्यानंतर काही वेळातच महापालिकेच्या पथकांनी शहरातील विविध ठिकाणी जाऊन पतंग व मांजा विक्री करणार्या दुकानांमध्ये तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोठेही चायना माझ्या आढळून आला नसल्याचे मनपाकडून सांगण्यात येत आहे.