मनपाच्या मुख्य लेखाधिकार्‍याकडे सापडले कोट्यावधीचे घबाड

लाचलुचपतच्या छाप्यात रोख रक्कम, सोने, फ्लॅटची कागदपत्रे जप्त
मनपाच्या मुख्य लेखाधिकार्‍याकडे सापडले कोट्यावधीचे घबाड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेचा (Ahmednagar Municipal Corporation) मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय 52) (Chief Accounting Officer Pravin Gopalrao Mankar) यास ठेकेदाराचे बिल (Contractor Bill) देण्याच्या बदल्यात 20 हजारांची लाच मागितल्यावरून (Bribe Demand) नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) अटक (Arrested) केली होती. मानकर याच्या घराची झडती घेतली असता 11 लाख 50 हजारांची रोख रक्कम, 540 ग्रॅम सोन्याचे दागिने (Gold jewelry), दीड किलो चांदी (Silver) आणि तीन फ्लॅटची कागदपत्रे अशी कोट्यावधी रूपयांची संपत्ती आढळून आली आहे. दरम्यान, मानकर याला लाचलुचपत विभागाने गुरूवारी न्यायालयात हजर (Court) केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी (Police Cell) सुनावली आहे.

तक्रारदार व त्यांचे मावसभाऊ यांनी ठेकेदार म्हणून महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) केलेल्या कामाची बिले मंजूर करून तक्रारदार यांना चेक अदा केलेच्या मोबदल्यात मानकर याने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपयांची मागणी (Demand Money) केली होती. लाच मागणी पडताळणीमध्ये मानकर याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपयांची मागणी करून 15 हजार रूपये स्विकारण्याची संमती दर्शवली. त्यानुसार बुधवारी लाचलुचपत विभागाने तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) मानकर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

मानकर याचे कुटुंबीय पुणे येथील फ्लॅट नंबर 102, फ्यांटसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी येथे राहत आहेत. मानकर यास अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने त्याच्या पुणे येथील घराची झडती घेतली. त्याच्या पत्नीकडे या रोख रक्कम, दागिने आणि फ्लॅटच्या कागदपत्रांबद्दल उत्पन्नाचा स्त्रोत विचारला असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. ही रोख रक्कम, दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com