मुंगी सरपंच हल्ला प्रकरणी दोघांना अटक

मुंगी सरपंच हल्ला प्रकरणी दोघांना अटक

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील मुंगी येथील सरपंचास कोयत्याने हल्ला करुन फरार झालेल्या संशयितास तसेच त्यास मदत करणार्‍या अशा दोघांना शेवगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे.

प्रमोद गायकवाड (रा. मुंगी, ता. शेवगाव) व त्यास घरामध्ये आश्रय देणारा वसंत दशरथ गव्हाणे ( रा.शेवगाव) अशी पोलीसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने त्यांना अटक केली. 19 जून रोजी मुंगी येथील सरपंच दादासाहेब बापुराव भुसारी हे पथकासह ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा पाईपलाईनवरुन घेतलेले अनधिकृत नळ कनेक्शन नियमीत करुन घे असे सांगण्यासाठी प्रमोद पंढरीनाथ गायकवाड याच्या घरी गेले होते.

याचा राग येवून आरोपी प्रमोद गायकवाड यांने शिवीगाळ करुन सरपंच भुसारी यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन जबर जखमी केले होते. गायकवाड याच्या विरोधा जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा तर ग्रामसेवक काळे यांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून गाकवाड फरार झाला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दोन पथके नियुक्त शेवगाव येथील वसंत दशरथ गव्हाणे यांच्या घरी छापा टाकून या दोघांनाही पकडून अटक केली आहे. पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके, रविंद्र बागुल सहाय्यक फौजदार भगवान बडधे, परशूराम नाकाडे, अशोक लिपणे, संतोष काकडे, रविंद्र शेळके, ढाकणे राजेंद्र, संपत खेडकर, अमोल ढाळे, महेश सावंत, सविता शिंदे, वृषाली गर्जे आदी पथकात सहभागी झाले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com