पोलीस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा

तरूणाविरोधात भिंगार कॅम्प पेालीस ठाण्यात गुन्हा
पोलीस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुंबई पोलीस भरतीचा (Mumbai Police Recruitment) पेपर फुटल्याबाबतची (Papers leaked) अफवा (Rumors) सोशल मिडीयावर पसरविणार्‍या तरूणावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. नीलेश दिलीप पोटे (वय 26 रा. बारादरी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी फिर्याद दिली आहे.

रविवारी मुंबई पोलीस भरतीचा पेपर (Mumbai Police Recruitment Paper) झाला. तत्पूर्वी पोटे याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले की, मुंबई पोलीस पदाची होणारी लेखी परीक्षा (Written Test) 14 नोव्हेंबरला राज्यात विविध केंद्रावर होणार आहे. तरी अहमदनगर (Ahmednagar) वरील काही केंद्रावर मुंबई पोलिसांचा पेपर फोडण्याच्या बातम्या येत आहेत. तरी यावर आपण तातडीने कारवाई करावी, अशी विनंती असे ट्विट केले होते. पोटे याने विद्यार्थांमध्ये भय पसरवून असंतोष किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होऊन परिक्षार्थी हे सार्वजनिक शांतता विरूद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होतील याची जाणीव असताना देखील ट्विट केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com