मुल्ला कटरची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू

अनेकवेळा तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही; नागरिकांची तक्रार
मुल्ला कटरची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर या 35 वर्षाच्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या; परंतु श्रीरामपूर शहर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. उलट गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक दिली जात असल्याने गुन्हेगारांची मानसिकता वाढत आहे. आता या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी शहरातील वॉर्ड नंबर दोन मध्ये मुल्ला याने एका पोलीस कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत दमबाजी केली होती. ही घटना ताजी असताना मुल्ला कटर याने तीन वर्षापूर्वी 13 वर्षाच्या (आज मुलीचे वय 16 आहे) एका मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थीनीला पळवून नेले होते. तिच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. बळजबरीने धर्मांतर केले. त्यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर या गुन्हेगाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके करत आहे. अटकेत असतानाही त्याने भिंतीला डोके आदळल्याचे समजते. लूटमार करणे, गावठी कट्टाचा धाक दाखवून परिसरामध्ये दहशत निर्माण करणे, महिलांच्या मानसिकतेचा फायदा घेत अत्याचार करणे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे, अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या मुल्ला कटरच्या विरुद्ध नागरिकांनी पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्याची दखल घेतली नाही. अशा तक्रारीची चौकशी आता सुरू झाली आहे.

श्रीरामपुरात सध्या पोलिसिंग दिसत नाही. त्यामुळे अनेक गुन्हेगार तयार होत आहे. शहरातील गुन्हेगारी हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडे असलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांचे पाठबळ पोलिसांना मिळत नाही. फक्त कागदी घोडे नाचविले जातात. लवकरच नगर पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अनेक गुन्हेगार निवडणूक रिंगणात उतरणार आहे. शहरातून तडीपार केलेले अनेक गुन्हेगार श्रीरामपूर शहरातच फिरत आहे, त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वेळीच दखल घेतली नाही तर श्रीरामपूुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com