मुल्ला कटर प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक

श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई
मुल्ला कटर प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अल्पवयीन मुलीस फूस लावून तिच्यावर अत्याचार करणे, धर्मांतर करुन निकाह करुन तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे या प्रकरणातील मुल्ला कटर गँगमधील आणखी एकास श्रीरामपूर शहर पोलिसांनी नेवासा फाटा येथून जेरबंद केले आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील गुन्हा रजि. नं. 733/2022 भादवि कलम 376 वगैर गुन्ह्यातील पसार गुफरान निसारखान पठाण ऊर्फ गुफ्या हा नेवासाफाटा परीसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक, राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी यांचे सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पोलीस नाईक फुरकान शेख या पथकास रवाना केले.

या पोलीस पथकाने काल मंगळवार दि. 02 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे 2 वाजणेचे सुमारास तपास पथक सापळा लावुन बसले असता, तेथे मिळालेल्या वर्णनाचा इसम आला असता, त्यास शिताफिने झडप घालून पोलिसांनी पकडले असता, त्याने त्याचे नाव गुफरान निसारखान पठाण ऊर्फ गुफ्या, रा. वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर असे सांगितले, त्यानुसार त्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आणून, त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग, संदीप मिटके हे करीत आहेत.

याप्रकरणात आता एकूण सात आरोपी झाले असून याअगोदर अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुध्द मोक्का लावून कारवाई करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com