मुळा पाणलोटात रिपरिप घाटघर 60, पांजरेत 47 मिमी पाऊस

मुळा पाणलोटात रिपरिप घाटघर 60, पांजरेत 47 मिमी पाऊस

कोतूळ, भंडारदरा |वार्ताहर| Kotul

गुरूवारी रात्री मुळा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू (Mula watershed begins to rain heavily) होता. पण काल शुक्रवारी पावसाचे प्रमाण घटले. दुपारनंतर पुन्हा रिपरिप सुरू होती. यामुळे मुळा नदी (Mula River) 1100 क्युसेकने वाहती आहे. तर गुरूवारी रात्री भंडारदरा पाणलोटातील (Bhandardara watershed) घाटघरमध्ये (Ghatghar) 60 मिमी पावसाची नोंद झाली. तर धरणात (Dam) गत 4 तासांत 32 दलघफू पाण्याची आवक झाली.

मुळा पाणलोटात (Mula watershed) शुक्रवारी जोरदार पाऊस होईल अशी आशा होती. पण तसे घडले नाही. सकाळी अधूनमधून रिमझीम होत होती. त्यानंतर रिपरिप सुरू होती. मुळा नदीचा (Mula river) कोतूळ (Kotul) येथील विसर्ग 1100 क्युसेक होता. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात 9233 दलघफू पाणीसाठा (Water Storage) आहे.

भंडारदरा पाणलोटात (Bhandardara watershed) शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने धरणात नवीन पाण्याची आवक झाली. भंडारदरा 30, घाटघर 60, पांजरे 47, रतनवाडी 36, वाकी 20 मिमी पावसाची नोंद झाली. वाकी धरणातही हळुवार आवक होत आहे. 102 दलघफू क्षमतेच्या या तलावात 54.72 दलघफू (48.57 टक्के) पाणीसाठा होता. मात्र या तुलनेत काल पाऊस कमी होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com