मुळा 20000
सार्वमत

मुळा 20000

पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

Arvind Arkhade

कोतूळ, भंडारदरा |वार्ताहर| Kotul Bhandardara

पाणलोटात तीन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असलेतरी अधूनमधून बरसणार्‍या सरींमुळे धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या या मुळा धरणात 5327 क्युसेकने आवक होत असल्याने काल सायंकाळी 6 वाजता 19938 दलघफू पाणीसाठा झाला होता. आज या धरणातील पाणीसाठा 20000 दलघफूपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

पावसाचा पुन्हा अंदाज देण्यात आला आहे. पाणलोटात पुन्हा पाऊस झाल्यास हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने येणारी आवक निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे. गत सायंकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरा धरणात 239 दलघफू पाणी आले. ते पाणी निळवंडेत सोडण्यात आले.

भंडारदरात सध्या 10613 दलघफू पाणीसाठा आहे. तर निळवंडेत 6935 दलघफू पाणी आहे. काल सायंकाळी भंडारदरातून 5540 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तर निळवंडेतून 8070 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. ओझर ओव्हरफ्लो 7649 क्युसेकने सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com