मुळा नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळला

File Photo
File Photo

कोंढवड |वार्ताहर| Kondhwad

राहुरी (Rahuri) तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi) शिवारात मुळानदी (Mula River) पात्रात एका अंदाजे 55 वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह (Woman Dead Body) पाण्यात आढळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

File Photo
भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता दुभाजकाला धडकल्याने पलटी

सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुळानदी (Mula River) पात्रात काही आदिवासी बांधव मासेमारी करण्यासाठी गेले असता त्यांना एका अनोळखी महिलेचा मृतदेह (woman Dead Body) पालथ्या अवस्थेत नदीपात्रात पाण्यात तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती राहुरी पोलीसांना कळवली. राहुरी पोलीसांच्या (Rahuri Police) पथकाने घटनास्थळी येऊन महिलेचा मृतदेह (Woman Dead Body) पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह जास्त दिवस पाण्यात राहिल्याने कुजलेल्या अवस्थेत व दुर्गंधी येत असल्याने या मृत महिलेची ओळख पटविण्यात अडसर निर्माण झाला. या मृत महिलेच्या अंगावर पिवळसर रंगाची साडी आहे.

File Photo
करोना.. आरोग्य यंत्रणा सतर्क

या कामी राहुरी पोलीस ठाण्याचे (Rahuri Police Station) कर्मचारी नदिम शेख, शिवाजी खरात यांना तांदुळवाडीचे अमोल पेरणे, अविनाश पेरणे, बाळासाहेब कांबळे, नवनाथ खाटेकर, महेश मोरे, रुग्णवाहिका चालक सचीन धसाळ व कोंढवड ग्रामपंचायतचे कर्मचारी सुभाष बर्डे यांनी भर पावसात मृतदेह (Dead Body) पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. मृतदेह उत्तर तपासणी साठी राहुरी येथे नेण्यात आला आहे. या अनोळखी महिलेच्या मृत्यूविषयी परिसरात घातपात की आत्महत्या? या विषयी तर्कविर्तक चर्चेतून काढले जात आहे. या घटनेचा पुढिल तपास राहुरी पोलीस करीत आहे.

File Photo
जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका 18 मे रोजी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com