
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील मुळा नदी पात्रातून शासनाच्या मालकीची वाळू चोरी करताना नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने कारवाई केली. वाळू उपसा करणार्याकडून वाळू उपसा साहित्य जप्त करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील हवालदार रणजित पोपट जाधव यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सहाय्यक फौजदार दिनकर मुंडे, हवालदार सुनील चव्हाण, बापुसाहेब फोलाने, पोलिस नाईक विशाल दळवी, भिमराज खर्से, विनोद माशाळकर, चालक उमाकांत गावडे आदी पोलीस पथक पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई कामी गस्त घालीत असताना गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरील पोलीस पथकाने राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गणेश सानप, बी. बी. थोरात यांना बरोबर घेऊन बारागावनांदूर शिवारात मुळा नदी पात्रात छापा टाकला.
त्यावेळी तेथे आरोपी हा ट्रॅक्टर व यारीचे सहाय्याने वाळू उपसा करीत असताना दिसून आला. पोलीस पथकाने ताबडतोब एक टॅ्रक्टर व वाळू काढण्यासाठी लागणारी यारी जप्त केली. शशिकांत उध्दव बर्डे, रा. बारागांव नांदूर ता. राहुरी. याला ताब्यात घेऊन गजाआड केले. हवालदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी शशिकांत उध्दव बर्डे व गोरख पारधी या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.