मुळा नदीवरील मानोरी-केंदळ पूल पावसामुळे कोसळला

मुळा नदीवरील मानोरी-केंदळ पूल पावसामुळे कोसळला

मानोरी, केंदळ, चंडकापूरचा संपर्क तुटला; वाहतुकीचा खोळंबा; तातडीने पूल बांधा

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी (Rahuri) तालुक्यातील पूर्वभागातील मानोरी- केंदळ (Manori-Kendal) या दोन गावांना जोडणार्‍या मुळानदीवरील (Mula River) बंधार्‍याशेजारील पूल अखेर कोसळला (bridge collapsed) असून तीन गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

मानोरी-केंदळ (Manori-Kendal) या दोन गावांना जोडणार्‍या मुळा नदीवरील (Mula River) बंधार्‍या शेजारील हा पूल (Bridge) गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झाला होता. त्यामुळे हा पूल (bridge) कुठल्याही स्थितीत कोसळण्याची परीस्थिती निर्माण झाला होती. मात्र, तरीदेखील या पुलावरून वाहतूक सुरू होती. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) मोठ्या प्रमाणात ओढे-नाले वाहू लागल्याने या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेला हा पूल (Bridge) अखेर कोसळला (collapsed) आहे. ही घटना रात्री उशीरा घडल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, आता मानोरी (Manori), केंदळ (Kendal), चंडकापूर (Chadkapur) आदी गावांचा संपर्क तुटला असून वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा पूल दुरुस्त व्हावा, यासाठी वेळोवेळी केंदळ आणि मानोरी येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा केलेला आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांच्याकडे माजी खासदार प्रसाद तनपुरे (Former MP Prasad Tanpure), राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून पाटबंधारे विभागाकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी 22 लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला आहे. त्या कामाची निविदा देखील जारी करण्यात आली आहे. मात्र, आता वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाल्याने तात्काळ या कामास सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी माजी उपसभापती रवींद्र आढाव (Ravindra Adhav), सरपंच अब्बास शेख, नवनाथ थोरात, गोकुळ आढाव, अनिल आढाव, संदीप आढाव, मच्छिंद्र आढाव, उत्तम खुळे, बबनराव साळुंखे, वैभव पवार, किशोर महाराज जाधव, निवृत्ती आढाव, डॉ.राजेंद्र पोटे, पोपट पोटे, शामराव आढाव, संभुगिरी महाराज गोसावी, बाबासाहेब आढाव, अण्णासाहेब तोडमल, अशोक आढाव, फकडभाई शेख, मुनसीभाई शेख, बशिर पठाण, शिवाजी आढाव, राजेंद्र आढाव, विकास आढाव, सुनील आढाव, ज्ञानदेव आढाव, पंढरीनाथ आढाव, चंद्रभान आढाव, नानासाहेब तनपुरे, बाळासाहेब पोटे, साहेबराव तनपुरे, हाफिज रफिक शेख, मुक्ततार शेख, महेबूब शेख, आयुब पठाण आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com