मुळा नदीपात्रातील अवैध वाळूची सर्रास वाहतूक

पोलिस व महसूल प्रशासनाचा आर्शिवाद
File Photo
File Photo

टाकळी ढोकेश्वर |वार्ताहर| Takali Dhokeshwar

पारनेर तालुक्यात अवैध वाळूसह दारूचा सुळसुळाट वाढतच असून याला महसूल, राज्य उत्पादन शुल्कसह पोलिस प्रशासन अधिकार्‍यांचे मोठे अभय आहे.

महसूल, राज्य उत्पादन शुल्कसह पोलीस अधिकारी सर्रास मलिदा गोळा करण्यात गुंग असल्याचे चित्र टाकळी ढोकेश्वरसह तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, पांगमल सारख्ये प्रकरण घडलेली असतांना राज्य उत्पादन शुल्क प्रशासन गप्प का? हे कुणालाच कळेनासे झाले आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारू, अवैध वाळू वाहतूक, अवैध वृक्षतोड, अवैध मावा विक्री करणार्‍यांसोबत महसूल अधिकारी, पोलिस लागेबांधे असल्याने महसूलसह पोलिस खाते निर्ढावले असून राजरोसपणे यात निष्पाप जनता यात बळीचा बकरा ठरत आहे.

तडजोडीचा तालुका म्हणून प्रसिध्द

पारनेर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अवैध धंदयांना उत आला असून महसूल राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्या तडजोडीत सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. फक्त तडजोडीवरच अवैध धंदे तेजीत असून राज्य उत्पादन व पोलीस प्रशासन महीण्याकाठी लाखो रूपयांची तडजोड करत असल्याने तडजोडीचा तालुका म्हणून पारनेर नाव जिल्हयात अव्वलस्थानी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com