
कोतूळ |वार्ताहर| Kotul
काल दुपारनंतर पाणलोटात पुन्हा पावसाने जोर धरल्याने कोतूळ येथे मुळा नदीला छोटा पूर आला आहे. मुळा नदी काठावर असलेल्या कोतुळेश्वर मंदिराला पाण्याने वेढले आहे. मुळा नदीतील पाणी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा धरण.26000 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल गुरूवारी सायंकाळी 12372(47.58 टक्के) होता. धरणाकडे येणारी आवक लक्षात घेता सकाळपर्यंत या धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेलेला असेल. मुळा नदीचा विसर्ग मंगळवार सायंकाळी केवळ 5638 क्युसेक होता. तो काल बुधवारी सायंकाळी 8028 क्युसेक होता. त्यात गुरूवारी आणखी वाढ होत 19732 क्युसेकवर गेला होता. रात्री त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.