मुळा नदीपात्रातील चार बंधारे भरून देण्याची मागणी

मुळा नदीपात्रातील चार बंधारे भरून देण्याची मागणी

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्यात मुळा धरण असून या धरणातून नदीपात्रात पाणी सोडून चारही बंधारे भरून देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. आता सध्या चारही केटीवेअर पूर्णपणे कोरडे पडले आहेत.

नदीकाठावरील सर्व पिके वाढायला लागले आहेत. तसेच अनेक शेतकर्‍यांनी नदीवरून शेतामध्ये पाईपलाईन केली आहे. अनेक शेतकर्‍यांनी बँकेचे, पतसंस्थेचे कर्ज काढून पाईपलाईन केली आहे. त्या पाईपलाईनवर अनेक शेतकर्‍यांनी उसाचे पीक, मका, घास इत्यादी पिके केले आहेत. पण आता बंधारे कोरडे झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मुळा नदीवरील मुळा कृती समिती स्थापन करण्यात आली.

यामध्ये शेतकरी दत्तात्रय घोलप, कृपाचार्य जाधव, विठ्ठल जाधव, श्रीराम तुवर, भरत जाधव, नानासाहेब झुंजारे, भाऊसाहेब विटनोर, विलास सौंदरे, राजू जंगले, विजय जंगले, संतोष नवगिरे, युवराज पवार, जालिंदर काळे, किसन विटनोर, विजय विटनोर, शुक्राचार्य वने, शिवाजी जाधव, ब्रह्मदेव जाधव, मुकिंदा काळे, विष्णू पवार, रवी गरुड, यशपाल पवार, नारायण खुळे, आदी शेतकर्‍यांनी कृती समिती स्थापन केली आहे.

ज्यावेळी धरण भरलेले असते किंवा धरणात पाणी असते तेव्हा एका वेळेस नदीला पाणी सोडले जाते. पण मात्र, सध्या मुळा धरणात पाणी असूनही देखील पाणी न सोडल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. मध्यंतरी ना. तनपुरे यांनी ना. जयंत पाटील यांना भेटून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकर्‍यांनी आपापला बंधार्‍यांसाठी प्लास्टिक बारदाणे लागते, यासाठी शेतकर्‍यांनी लोकवर्गणी देखील गोळा केली आहे.

पण पाणीच नाही आले. पाणी न आल्यास कृती समिती करोना महामारी रोग असल्यामुळे आपापल्या गावातच एक शेतकरी मारुती मंदिरासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेणार आहे. त्याकरीता कृती समितीने निवेदनात म्हटले, नामदार, खासदार यांनी तात्काळ लक्ष घालून मुळा नदीला त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com