संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील घारगाव लगत असणार्या मुळा नदीपात्रात 42 वर्षीय इसमाचा मृतदेह काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास आढळून आला आहे.

शांताराम तात्याभाऊ शिंदे (रा.नांदूर खंदरमाळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह तंरगत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी घारगाव पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळी भेट दिली.

ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.