मुळा उजव्या कालव्यावरील 193 पाणीवापर संस्थांना 30 लाखांचा पाणीपट्टी परतावा

मुळा उजव्या कालव्यावरील 193 पाणीवापर संस्थांना 30 लाखांचा पाणीपट्टी परतावा

नेवासा | Newasa

नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) मुळा धरणाच्या (Mula Dam) उजव्या कालव्यावर कार्यरत असलेल्या 193 पाणी वापर संस्थांनी 2019-20 मध्ये जलसंपदा विभागाला (Department of Water Resources) भरलेल्या एकूण पाणीपट्टीच्या (Water Bill) 50 टक्के परताव्याची रक्कम 30 लाख 6 हजार 613 रुपये अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाने (Ahmednagar Mula Irrigation Department) अदा केली असून यात नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) 110 पाणी वापर संस्थांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने वापरकर्त्यांचा सहभागातून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, समान पाणी वाटप करणे, प्रभावी पाणीपट्टी जमा करणे यासाठी पाणी वापर संस्थांकरिता स्वतंत्र कायदा महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे (Maharashtra Irrigation System) शेतकर्‍यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 व नियमावली 2006 करण्यांत आली.

पाणी वापर संस्थांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी पाणी वापर संस्थांना पाणीपट्टीतून 50 टक्के, 75 टक्के ते 93 टक्के पर्यंतची रक्कम परत देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद या कायद्यात आहे.

पाण्याच्या कार्यक्षम वापरा संबंधी उपाययोजना करता याव्यात याकरिता सर्व संस्थांना आपली लघुवितरिका साफसफाई करण्याचे नियोजन, व्यवस्थापन खर्च यासाठी परतावा देण्याची तरतूद आहे. पाणी वापर संस्थेने भरलेल्या पाणीपट्टीच्या 50% पाणीपट्टी परतावा शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर दिला जातो.

नगर जिल्ह्यातील मुळा धरणावर (Mula Dam) उजव्या कालव्यावर 279 तर डाव्या कालव्यावर 30 असा एकूण 309 पाणी वापर संस्था कार्यरत आहेत.

राहुरी उपविभागांतर्गत (Rahuri Sub Division) येणार्‍या 23 संस्थांना 2 लाख 51हजार 591 रुपये, नेवासा उपविभागांतर्गत (Newasa Sub Division) येणार्‍या 38 संस्थांना 6 लाख 25 हजार 250 रुपये, चिलेखनवाडी उपविभागांतर्गत येणार्‍या 45 संस्थांना 5 लाख 80 हजार 785 रुपये, घोडेगाव उपविभागांतर्गत येणार्‍या 24 संस्थांना 3 लाख 49 हजार 298 रुपये, अमरापूर उपविभागांतर्गत येणार्‍या 58 संस्थांना 11 लाख 99 हजार 689 रुपये या प्रमाणे एकूण 30 लाख 6 हजार 613 रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. यात नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) 110 पाणी वापर संस्थांचा समावेश आहे.

अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाच्या (Ahmednagar Mula Irrigation Department) कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपकार्यकारी अभियंता प्रकाश अकोलकर यांचे पुढाकाराने शासनाकडून प्राप्त झालेल्या पाणीपट्टी रकमेच्या धनादेशाचे वितरण नुकतेच करण्यात आले.

सिंचनामध्ये वापरकर्त्याचा सहभाग वाढवून पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची उत्पादकता वाढवावी यासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने राज्यातील प्रकल्पांवर कालवास्तरीय, वितरिका स्तरीय, लघुवितरिकास्तरीय पाणी वापर संस्था स्थापन केलेल्या आहेत. शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोहचविणे व पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा हा त्या मागचा हेतू आहे. सन 2019-20 या सिंचन वर्षात पाणी वापर संस्थांकडून वसूल केलेली पाणीपट्टी रक्कम शासनाकडे जमा केली होती. त्याची 50 टक्के परताव्याची रक्कम प्राप्त झाली असून संबंधित पाणी वापर संस्थांना त्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या (Mula Irrigation Department) सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.