मुळा उजवा कालव्याच्या 52 किलोमीटरचे दुरुस्तीचे काम होणार

जलसंपदा मंत्री जयंत पाटील व ना. गडाख यांच्या उपस्थितीत मुळा उजवा कालवा दुरुस्ती कामकाज आढावा बैठक
मुळा उजवा कालव्याच्या 52 किलोमीटरचे दुरुस्तीचे काम होणार

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) शेती व पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचा असणार्‍या मुळा धारणाअंतर्गत (Mula Dam) मुळा उजवा कालवा (Mula Right Canal) व त्यावरील कामांची आढावा बैठक (Review Meeting) मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख (Minister of Soil and Water Conservation Shankarrao Gadakh) यांच्या पुढाकाराने जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांचेकडे काल बुधवारी मुंबई येथे झाली. यावेळी मुळा कालव्याच्या 52 किलोमीटर अंतरातील कालवा अंतर्गत दुरुस्ती, कालवा मुख्य चारीवरील सर्व लोखंडी गेट बदलने व त्या कामांना गती देणे याबाबत आदेश देण्यात आले.

बैठकीस राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure), माजी आमदार नरेंद्र घुले (Former MLA Narendra Ghule), चंद्रशेखर घुले (Chandrasekhar Ghule), शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, जलसंपदाचे सचिव श्री. स्वामी, सहसचिव अतुल कपोले, उप सचिव पूर्णिमा देसाई, नासिक मुख अभियंता संजय बेलसरे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, नगरच्या पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता श्री. नाईक, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पुनर्वसित गावांना आवश्यक त्या नागरी सुविधा पुरविणे. नेवासा तालुक्यातील घोगरगाव (Ghogargav), बेलपांढरी (Belpandhari), जैनपूर (Jainpur) परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित करणार्‍या कापरी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे या बाबीवर जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील व मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत प्रामुख्याने चर्चा होऊन कामे मार्गी लावण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

दुरुस्ती तातडीने झाल्यास पाण्याचीही बचत - ना. गडाख

बैठकीत नामदार शंकरराव गडाख यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ज्या वेळेस शेतीसाठी आवर्तन चालू असते त्यावेळी कालवे नादुरुस्त असल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो त्यामुळे ही दुरुस्ती तातडीने झाल्यास शेतकर्‍यांना वेळेवर पाणी मिळेल तसेच पाण्याचीही बचत होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com