मुळा उजवा कालवा वितरका दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी द्या

नरेंद्र घुले पाटील यांची जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचेकडे मागणी
मुळा उजवा कालवा वितरका दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी द्या

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

नेवासा (Newasa), शेवगाव (Shevgav) व पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे (Get water at full pressure) यासाठी मुळा उजवा कालव्यावरील (Mula Right canal) ब्रँच-2 ,टेल डीवाय व पाथर्डी ब्रँच (Pathardi Branch) नूतनीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (Former MLA Narendra Ghule Patil) यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील (Water Resources Minister Jayantrao Patil) यांचे कडे केली आहे.

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंतराव पाटील (Minister of Water Resources and Beneficiary Area Development Jayantrao Patil) यांचे अध्यक्षतेखाली आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात (Ahmednagar Collector Office) जलसंपदा विभागाची आढावा बैठक (Water Resources Department Review Meeting) संपन्न झाली.त्यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (Former MLA Narendra Ghule Patil) यांचे नेतृत्वाखाली नेवासा (Newasa), शेवगाव (Shevgav) व पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने ना.पाटील यांची भेट घेऊन मुळा उजवा कालवा वितरका (Mula right canal distributor) नूतनीकरण करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना माजी आ. घुले पाटील म्हणाले,जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) होतांना धरणासाठी (Dam) जमिनी गेल्या त्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना (To Dam-Affected Farmers) आणि पूर्वसन करण्यासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना मुळा धरणाचे (Mula Dam) 12 माही पाणी देण्याचे सरकारने आश्वासित केले होते. मात्र प्रत्यक्षात कोणालाच पाणी मिळत नाही. मागील वर्षी मुळा धरण (Mula Dam) 100 टक्के भरून सुद्धा टेलच्या भागात पाणी पोहचले नाही. त्यामुळे नेवासा (Newasa), शेवगाव (Shevgav) व पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे.

यासाठी मुळा उजवा कालव्यावरील 30 गावांना लाभ मिळणारी ब्रँच-2 चे नूतनीकरणासाठी 4 कोटी 97 लाख ,25 गावांना लाभ मिळणारी टेल डीवायच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी 60 लाख रुपये व 36 गावांना लाभ मिळणारी पाथर्डी ब्रँचच्या नुतनीकरणासाठी 3 कोटी 36 लाख असा 9 कोटी 97 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी केली.

तसेच नेवासा तालुक्यात असणार कौठा या गावात मुळा मुख्य कालवा नेहमीच फुटत असतो त्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी होते याबाबत तोडगा काढण्यासाठी सद्यप्रश्नांकडे श्री.घुले यांनी मंत्री महोदय आणि उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटिल यांनी मा.आ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांचे मुद्दे गांभीर्याने घेत या प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्याच्या सुचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडचणीही दूर केल्या जातील असे आश्वासन देऊन या कामासाठी तातडीने निधी देण्याचे ही आश्वासन दिले.

या बैठकीला माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील (Former MLA Chandrasekhar Ghule Patil) ,आ.लहु कानडे (MLA Lahu kanade), आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap), आ.डॉ.किरण लहामटे (MLA Kiran Lahamate), माजी आ.पांडुरंग अभंग, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, काशिनाथ नवले, निवृत्ती दातीर यांचेसह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जलसंपदाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, विशेष प्रक्पल्प, पुण्याचे मुख्य अभियंता एस.टी.धुमाळ, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक अ.रा.नाईक, नाशिकच्या अधिक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक श्रीमती अ.ह.अहिरराव, अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता का.ल.मासाळ, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नेार, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, कुकडी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील शिंदे, लघु पाटबंधारे क्रमांक दोन विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती संगिता जगताप, संगमनेर येथील उर्ध्व प्रवरा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.लव्हाट, संगमनेर येथील उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माने आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.