मुळाकाठ परिसरात पुन्हा एकदा जोरदार पावसामुळे शेतात सर्वत्र साचले तळे

पिकांचे प्रचंड नुकसान; काढणी करणे झाले अशक्य
मुळाकाठ परिसरात पुन्हा एकदा जोरदार पावसामुळे शेतात सर्वत्र साचले तळे

करजगाव |वार्ताहर| Karajgav

मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडले परमानंद, अंमळनेर, निंभारी, वाटापूर, लांडेवाडी, बेल्हेकरवाडीसह परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतातील कपाशी, सोयाबीन, बाजरीसह जनावरांच्या चारा पिकांमध्ये अजूनही पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुळाकाठ परिसरात बुधवार, गुरूवार, शुक्रवारी परिसरात जोरदार पाऊस झाला.तसेच नगर व राहुरी तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ओढ्याद्वारे मुळाकाठ परिसरात येते. यामुळे मुळाकाठ परिसरातील ओढे भरभरून वाहत आहे.सर्वच पिकामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे शेतांचे तळे झाले आहे. त्यातच पावसाची ही स्थिती आणखी दोन-तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने काढणीला आलेले बाजरी, सोयाबीन पीक कसे काढायचे? कपाशी कशी वेचायची या विचाराने बळीराजा हवालदिल झाला आहे.

सततच्या पावसामुळे शेतातील पीके पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

मुळाकाठ परिसरातील शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी असूनही याकडे मात्र अजुनही कुठलाही अधिकारी फिरकला नसल्यामुळे शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com