शेअर्सच्या रकमेवरून कुणाचाही मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही

शेअर्सच्या रकमेवरून कुणाचाही मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही

मुळा-प्रवराच्या सभासदांना अध्यक्ष खा. विखे यांचा दिलासा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मुळा प्रवरा वीज संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शेअर्सची रक्कम 200 वरून पूर्ववत 50 रुपये करावी, अशी मागणी काहींनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यास त्यांनी सुचविले आहे. शेअर्सची रक्कम कितीही असली तरी संस्थेचा सभासद मतदानापासून वंचित राहणार नाही. 50 रुपयांचा शेअर्स असलेला सभासदही मतदानास पात्र राहील, असे स्पष्टीकरण संस्थेचे चेअरमन व खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

खा. विखे यांनी काल संस्थेत येवून संचालक व अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी सभापती दिपक पटारे, भाजपाचे प्रकाश चित्ते, नानासाहेब शिंदे यावेळी उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले, सन 2014 मध्ये संस्थेच्या शेअर्सची रक्कम 50 रुपयांवरून 100 रुपये करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. त्यास तत्कालीन संचालक मंडळाने विरोध दर्शविला होता. तसे पत्र जिल्हा निबंधकांना दिले होते. त्यानंतर शासनाच्या सांगण्यावरून शेअर्सची रक्कम 50 वरून 200 रुपये करण्यात आली. त्यानंतर आजपर्यत एकही सभासद झाला नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यापासून पुढे त्याची अंमलबजावणी होते. त्यानुसार सन 2014 च्या पुढे हा निर्णय लागू होतो. सन 2016 ला संस्थेची निवडणूक होवून आताचे संचालक मंडळ आले असून या मंडळाची चार महिन्यापुर्वी मुदत संपली आहे. सन 2016 ला 50 रुपये शेअर्स असलेले सभासद ग्राह्य धरुन निवडणूक पार पडली. त्यावेळी 20 हजार सभासद पात्र होते.

संचालक मंडळाची मुदत संपल्याने निवडणूक आयोगाकडे दोनवेळा स्मरणपत्र देण्यात आले आहे. मात्र कोविडमुळे उत्तर प्राप्त झाले नाही. मधल्या काळात सभासदांनी जिल्हा निबंधकांकडे पत्रव्यवहार करून शेअर्सची रक्कम कमी करण्याची मागणी केली आहे. भविष्यात निवडणूक होईल, त्यात मतदानाच्या गैरसमजातून ही मागणी करण्यात आली आहे. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यास जिल्हा निबंधकांनी सुचविले आहे. आज संस्थेचे 50 हजार सभासद बिगर थकबाकीदार आहेत. सर्वसाधारण सभेत ठराव केला तरीही हे सर्व मतदानास पात्र राहतील. ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांनी ती भरली तर तेही पात्र होतील. 50 रूपयांचा शेअर्स असणारा सभासदही मतदानास पात्र राहील, मात्र तो थकबाकीदार नसावा, शेअर्सच्या रकमेवरून कुठल्याही सभासदाचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com