शेअर 50 रुपये करण्याचा ठराव मांडणार

डॉ. विखे यांची माहिती ; 30 सप्टेंबरला ‘मुळा-प्रवरा’ची ऑनलाईन वार्षिक सभा
शेअर 50 रुपये करण्याचा ठराव मांडणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेची (Mula-Pravara Electricity Co-operative Society) 30 सप्टेंबरला ऑनलाईन वार्षिक सभा (Online Annual Meeting) होणार आहे. या वार्षिक सभेमध्ये कुणाच्याही मनात मतदानाच्या अधिकाराबाबत शंका राहू नये म्हणून 200 रुपयांच्या शेअरची (Share) किंमत 50 रुपये करण्याचा ठराव या वार्षिक सभेमध्ये मांडण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन खा.डॉ.सुजय विखे पाटील (MP. Dr. Sujay Vikhe Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

वार्षिक सभेच्या नियोजनासाठी संचालक मंडळाची सभाही झाली. यावेळी पत्रकारांना माहिती देताना खा.डॉ. सुजय विखे पाटील (MP. Dr. Sujay Vikhe Patil) म्हणाले, शेअरची किंमत 200 असो किंवा 50 असो कुणालाही मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे मागच्याच वेळेस स्पष्ट करुनही गेल्या काही दिवसांत शे-दीडशे सभासदांनी त्यांच्या 50 रुपयाच्या शेअरची किंमत 200 रुपये पूर्ण करण्यासाठी संस्थेत पैसे भरायला गर्दी केली. सध्या कोविडच्या तिसर्‍या लाटेचा धोका आहे. नगरमध्ये रुग्ण वाढल्याची नोंद दिसून येत आहे.

त्यामुळे सभासदांची गर्दी टाळण्यासाठी आणि सभासदांमध्ये मतदानाच्या अधिकाराबाबत असणारा संभ्रम दूर करण्यासाठी शेअरची किंमत 200 हून 50 रुपये करण्याचा ठराव वार्षिक सभेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे 2014 ला ज्याप्रमाणे सर्वांना मतदानाचा अधिकार होता तसाच अधिकार 2021-22 किंवा जेव्हा तेव्हा मुळा-प्रवराची निवडणूक (Mula- Pravara election) होईल तेव्हा सभासदांना राहणार आहे. सभासदांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. कोणताही गैरसमज शेअरच्या रकमेवरुन राहू नये आणि कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून हा निर्णय घेत असल्याचे खा.डॉ. विखे पाटील (MP. Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले. 30 तारखेला होणारी मिटींग ही ऑनलाईन होणार असून, सभासदांना वर्तमानपत्रातून लिंक दिली जाणार आहे. त्या लिंकवर क्लिक करुन सभासदांना या ऑनलाईन मिटींगमध्ये सहभागी होता येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुळा-प्रवराचे संचालक संजय छल्लारे यांनी मयत सभासदांच्या वारसांना सभादत्व देणार का? अशी विचारणा सभादांच्या वारसांकाडून होत आहे. त्यामुळे याबाबत काय करता येईल? असा मुद्दा मांडला असता याबाबत जिल्हा उपनिबंधकांचे मार्गदर्शन घेवून निर्णय घेतला जाईल असे चेअरमन खा. सुजय विखे (MP. Dr. Sujay Vikhe Patil) यांनी यावेळी सांगितले. जी.के. बकाल पाटील यांच्या निधनामुळे गेल्या आठ महिन्यापूर्वी संस्थेचे व्हा. चेअरमनपद रिक्त झाले आहे. त्यामुळे व्हा. चेअरमन बरोबरच दोन तज्ज्ञ संचालकांची निवड करण्याबाबत वार्षिक सभेत निर्णय घेण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी डॉ. सुजय विखे (MP. Dr. Sujay Vikhe Patil) यांनी काही राज्यात जसे दोन उपमुख्यमंत्री आहेत तसे मुळा-प्रवरा संंस्थेसाठी दोन व्हा. चेअमन निवडावेत का ? असा मुद्दा मांडून तसे केले तर राहुरी व श्रीरामपूर तालुक्याला समान न्याय देता येईल असे ते म्हणाले.

यावेळी सिद्धार्थ मुरकुटे, इंद्रभान पा. थोरात, जलिलभाई पठाण, अंबादास पा. ढोकचौळे, तुकाराम बेंद्रे, संजय छल्लारे, ताराचंद तनपुरे, देवीचंद तांबे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com