मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी उदयन गडाख

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी उदयन गडाख

सोनई |वार्ताहर| Sonai

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी उदयन शंकरराव गडाख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी ‘मुळा’ची स्थापना केली होती त्यानंतर प्रशांत गडाख यांनी कृषी महाविद्यालय, फार्मसी सह विविध महाविद्यालये चालू केली आहेत. विविध सामाजिक क्षेत्रात या संस्थेचा मोठा सहभाग असतो.

मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख हे आजारी असल्याने प्रशासकीय अडचण पाहता मुळाचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव गडाख व विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते उपाध्यक्षपदी उदयन शंकरराव गडाख यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे यांनी दिली.

उदयन गडाख यांच्या सक्रिय सहभागाचा फायदा संस्थेस, विद्यार्थ्यांना व परिसरातील पालकांना निश्चित मिळेल असेही सचिव लोंढे यांनी सांगितले.

या निवडी बद्दल मुळा उद्योग समुह, यश ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ, शंकरराव गडाख युवा मंच,उदयन गडाख मित्र मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com